सूक्ते.
सज्जनाची संगत धरल्याने माणसाला सुख लाभते.
कटकट करणारी पत्नी, मूर्ख पुत्र , हलक्या माणसाची चाकरी, भांडखोर शेजार ही सर्व माणसाच्या शरीराला अग्नीशिवाय जाळतात.
या संसारात म्हातारपणी माणसाला सुख देणाऱ्या तीनच गोष्टी आहेत. आपली मुले, साथ देणारी पत्नी आणि सज्जनांची संगत.
तीन गोष्टी एकदाच होतात. राजा एकदाच हुकूम करतो. शहाणा माणूस एकदाच बोलतो. कन्यादान एकदाच करता येते.
तपसाधना एकट्यानेच करावी. विद्या दोघांनी मिळून शिकावी. तिघांनी मिळून गाणे शिकावे. प्रवास चौघांनी मिळून करावा. शेती पाचजणांनी मिळून करावी. पण युध्द मात्र अनेकजणांनी मिळून करावं.
पुत्राशिवाय घराला शोभा नाही. भाऊबंद नसतील तर माणूस दिशाहीन होतो. मूर्ख माणसाला नेहमीच दु:ख सहन करावे लागते.
भांडखोर पत्नी, भाउबंदकी करणारे भाऊ. हूशार नसलेला मालक आणि ज्या धर्मात दया नसेल अशा गोष्टी सोडून द्याव्यात.
न पचलेले अन्न विषासारखे असते. दारिद्रय हे माणसाला विषासमानच असते. म्हाता-याला तरुण पत्नी विषासमानच असते.
कोणतेही ज्ञान उपयोगात आणले नाही तर ते वायाच जाते.
ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य यांना अग्नी हा गुरुसारखा असतो. संसारात अतिथी हा गुरुसारखा असतो. पती हा स्त्रीचा गुरु असतो. अशा व्यक्तिंना नेहमी आदराने वागवावे.
वैराग्य आलेल्या माणसाचा संसार यशस्वी होत नाही. ज्याला वासना नसते त्याला शृंगारात रस नसतो. विव्दान माणूस नेहमीच गुळमिळीत बोलतो. साधा सरळ माणूस इतरांशी वागताना कपट कधीच करु शकत नाही.
हेवा करणे ही माणसाची उपजत प्रवृत्ती आहे. मूर्ख माणूस विव्दानाचा हेवा करतो. गरीब श्रीमंताचा हेवा करतो. वेश्या संसारी स्त्रीचा हेवा करते आणि विधवेला सुवासिनीचा हेवा वाटतो.
आळशी माणसाची विद्या नष्ट होते. पण समतोल आहार आणि मनावर संयम ठेवल्याने विद्येचे रक्षण करता येते. दयाळू प्रजा राजाचे रक्षण करते. सुसंस्कृत व सुशील स्त्रीमुळे घराचे रक्षण होते. सेनापती दुर्बळ असेल तर सैन्य हरते.
Previous Page- Chanakya Niti in Marathi - सूक्ते. (Page-19)
Next Page - Chanakya Niti in Marathi - सूक्ते. (Page-21)
Tags:- chanakya niti advise,Chanakya Niti in Marathi, Chanakya Niti pdf in Marathi, Chanakya Niti ebook in Marathi, chanakya quotes, chanakya quotes in marathi, chanakya quotes on success, chanakya quotes on Advices, Chanakya's says on leadership of a ruler, ethics of chanakya in marathi, chanakya neeti pdf download. Chanakya advices for prostitute .Sampurna chanakya neeti. Chanakya Nit for Leadership.
Comments
Post a Comment