कुटुंबाविषयी
ज्या व्यक्तीला गुण व अवगुणाची पारख असते, जो चांगल्यावाईटाचा विचार करुन वागतो त्यालाच जीवनात खरे सुख मिळते. दु:ख मिळालेच तर अतिशय कमी प्रमाणात सहन करावे लागते.
ज्याची पत्नी दुष्ट आहे, भांडकुदळ आहे, मित्र लबाड आहेत, नोकर उर्मट आहेत, आणि ज्याच्या घरात सर्प हिंडत असतात अशा माणसाला सुख कधीच मिळत नाही. आणि अशा माणसाला मृत्यू कोणत्याही क्षणी येऊ शकतो.
घरातील मंडळी शत्रूपासून धोका आधीच ओळखतात आणि घराचं संरक्षण करण्यासाठी घरातील मंडळी आपले तन, मन आणि धन कुटुंबाला अर्पण करुन मदत करता.
ज्या घरातील मुलगा पित्याच्या वचनात असतो, ज्याची स्त्री पतिव्रता असते, कुटुंब प्रमुखाने कमावून आणलेल्या पैशात सुखासमाधानाने घर चालवते, ज्या कुटुंबातील माणसे एकमेकांशी सलोख्याने वागतात अशा माणसाच्या घरात स्वर्गसुख असते.
माणसाला अनेक कारणांमुळे दु:ख सहन करावे लागते. बुध्दिमत्ता नसल्यामुळे किंवा निर्णय घेता येत नसल्यामुळे किंवा चुकीचे निर्णय घेतल्यामुळे त्याला दु:ख सहन करावे लागते. पण दुसऱ्याच्या घरात आश्रित म्हणून रहावे लागण्या इतके दु:ख या सर्वांपेक्षाही मोठे असते. थोडक्यात परक्या घरात रहावे लागण्या इतके दु:ख कोणतेच नसते.
Previous Page- Chanakya Niti in Marathi - मित्राविषयी. (Page-05)
Comments
Post a Comment