Chanakya Niti in Marathi - दैनंदिन व्यवहाराविषयी निरीक्षणे. (Page-14)

 दैनंदिन व्यवहाराविषयी निरीक्षणे.


     सतत कष्ट आणि तप केल्यानेच विद्या मिळते, अगदी साधा सरळ स्वभाव असणे चांगले नसते. जंगलात जी झाडे सरळ साधी असतात तीच कापली जातात. वेड्यावाकडया झाडांना कुणी हात लावत नाही. म्हणून अती नम्र स्वभावही चांगला नाही.


    पक्षी अन्न-पाण्याच्या शोधात सतत स्थलांतर करीत असतात. हंस पक्षी पाणी असेल तिथेच राहतो. फळे असणाऱ्या झाडावरच पक्षी गर्दी करतात. पण माणसाने असे करु नये. असे केल्याने माणसाच्या आयुष्यात गोंधळ निर्माण होईल.


     यवन हा पापाचा आणि दुर्गुणुचा पुतळा असतो. पण जो धूर्त आहे आणि पूर्वग्रहदूषित नाही, त्यालाच हे लागू पडते.


    जेवण झाल्यावर काहीवेळाने पाणी प्यावे. त्याने अन्न पचायला मदत होते. याउलट जेवण झाल्यावर लगेच पाणी पिल्याने ते विषासमान होते. ते आरोग्याला घातक असते.


    माणसाने काही गोष्टी नेहमी लक्षात ठेवल्या पाहिजेत.

  •  सातू हा पदार्थ शरीराला ताकद देतो.
  • चांगले रुचकर जेवण हे सर्वात उत्तम सुख.
  • सर्व शरीरात मस्तक श्रेष्ठ आणि सर्व इंद्रियात डोळा श्रेष्ठ.

Is chanakya a horse?; Chanakya Niti in Marathi; free Chanakya Niti in Marathi; download Chanakya Niti in Marathi; chanakya niti eye advice; chanakya niti- horse think;


     आपल्या हाताने केलेले काम नेहमी उत्तमच असते. आपल्या हातंनी तयार केलेली मण्यांची माळ, आपल्या हाताने उगाळलेले गंध, आणि आपण स्वत: म्हंटलेली स्त्रोत्रे सर्वात चांगली असतात. ती मनाला सुख आणि समाधान देतात. दुसऱ्यावर अवलंबुन राहिल्याने माणसाचे नुकसान होते. तो आपल्याच नजरेतून उतरतो. म्हणून नेहमी स्वावलंबी असावे.


    माती, उस, तीळ, चंदन आणि सोने जितके घासावे तितके शुध्द होतात आणि सुंदर दिसतात. कच्या भाज्या शिजवताना त्यांची चव वाढविण्यासाठी त्यात मसाले टाकण्यासारखे हे आहे.


    माणसाने आपले प्रत्येक कर्म विचारपूर्वक करावे. प्रत्येक पाऊल मागेपुढे पाहून टाकावे. समाजामध्ये सभ्यपणे रहावे. नीतिनुसार बोलावे. स्वच्छ पाणी प्यावे.


    मौजमजा आराम करणाऱ्याला विद्या आणि ज्ञान कधीच प्राप्त होणार नाही. ज्याला आत्म्याचे ज्ञान मिळवायचे असेल त्याने शरीरसुखाचा व इंद्रियसुखाचा त्याग करायला हवा. 

Previous Page- Chanakya Niti in Marathi -  दैनंदिन व्यवहाराविषयी निरीक्षणे. (Page-13)

Next Page - Chanakya Niti in Marathi -  दैनंदिन व्यवहाराविषयी निरीक्षणे. (Page-15)

Tags:-   chanakya niti book in marathi, chanakya niti book in marathi pdf free download, chanakya niti book in marathi free, chanakya niti ,chanakya niti quotes in marathi; chanakya niti pdf marathi; chanakya niti book in marathi; chanakya niti for success,chanakya niti book.



Comments