Chanakya Niti in Marathi - दैनंदिन व्यवहाराविषयी निरीक्षणे. (Page-13)

दैनंदिन व्यवहाराविषयी निरीक्षणे.


     मी माझा वेळ कसा घालवतो आहे? माझे मित्र कोण आहेत, शत्रू कोण आहेत? मी कोणत्या देशाचा नागरिक आहे? माझ्या कर्मामुळे माझा किती फायदा आणि किती नुकसान होणार आहे? प्रत्येकाने अशा प्रश्नांवर नेहमी गंभीरपणे विचार करायला हवा. कारण या प्रश्नांच्या उत्तरामध्येच त्यांचे नशिब आणि यश लपलेले आहे.


    शहाण्या माणसाने भविष्यकाळात येणाऱ्या अडचणींचा आधीच विचार करावा. आणि त्या अडचणी दूर करण्यासाठी आधीच तयार असावे. असा दूरदर्शीपणा नसलेला माणूस अडचणीत सापडतो आणि त्याची वाईट फळे त्याला भोगायला लागतात.


    अडचणी किंवा संकटे क्षितिजावर असेपर्यंतच त्याची काळजी करावी. दुर्दैवाने कधी ती अचानक आली तर न भिता त्यांना सामर्थ्यानिशी धीराने तोंड द्यावे.


    श्रीमंत माणसाभोवती नातेवाईकांचा गोतावळा नेहमीच असतो. गरीब माणसाकडे कुणी बघत नाही. संपत्तीवर डोळा ठेवून जवळ येणाऱ्या नातेवाईकांपासून नेहमी दूर रहावे.


     सिंह जे काही करतो ते आपली शक्ती पणाला लावून, एकाग्र चित्ताने आणि निष्ठेने करतो, हे गुण सिंहापासून घ्यावे.

chanakya niti book, chanakya niti book in marathi, chanakya niti book in marathi pdf free download, chanakya niti book in marathi free, chanakya niti ,chanakya niti quotes in marathi; chanakya niti pdf marathi; chanakya niti book in marathi; chanakya niti for success.


    कोंबड्याला पहाटेच जाग येते. तो आपल्या शत्रूशी लढायला नेहमी तत्पर असतो. तो इतरांचे अन्न चोरुन नेण्यात पटाईत असतो. हे गुण कोंबड्यांपासून घ्यावे.


    खायला जे मिळेल त्यात समाधान मानणे, गाढ झोप लागली असतानाही चटकन जागे होणे, स्वामीभक्ती व बहादुरी हे गुण कुत्र्यापासून घ्यावे.


    कावळा योग्यवेळी गरजेच्या वस्तंचा साठा करतो. तो कणावरही विश्वास ठेवत नाही. तो अतिशय सावध असतो. आणि लैंगिकसुख गुप्तपणे घेतो. हे गुण कावळ्यापासून शिकावे.


    शरीर खूप थकलेले असतानाही पडेल ते काम करणे, थंडी उन वाऱ्याची पर्वा न करणे, कुठल्याही परिस्थितीत निमूट गप्प राहणे हे गुण गाढवापासून घ्यावेत.


    वरील सर्वगुण अंगीकारल्यास माणसाला कोणत्याही अडचणीवर मात करता येते.


    जो प्रामाणिकपणे ज्ञानसंग्रह करतो, पैसा आणि अन्न घाईघाइने संपवत नाही आणि ज्याचा देण्याघेण्यावर ठाम विश्वास असतो असा माणूस सुखी असतो.


    जो नेहमी पैशाच्या मागे लागतो त्याला जे मिळेल त्यात समाधान मानण्यासारखे सुख कधीच मिळत नाही.


    वैयाशी आधी गोड बोलून काम साधते का ते बघावे. तरीही शत्रू वैर सोडत नसेल तर मात्र त्याचा नाश करायला मागे पुढे पाहू नये.

Previous Page- Chanakya Niti in Marathi -  दैनंदिन व्यवहाराविषयी निरीक्षणे. (Page-12)

Next Page - Chanakya Niti in Marathi -  दैनंदिन व्यवहाराविषयी निरीक्षणे. (Page-14)

Tags:-  chanakya niti book, chanakya niti book in marathi, chanakya niti book in marathi pdf free download, chanakya niti book in marathi free, chanakya niti ,chanakya niti quotes in marathi; chanakya niti pdf marathi; chanakya niti book in marathi; chanakya niti for success.

Comments