Chanakya Niti in Marathi - सूक्ते. (Page-18)

 सूक्ते.


    मूर्खाला कधीही उपदेश करु नये. भांडखोर स्त्रीच्या कधीही नादी लागू नये आणि संकटात सापडलेल्यांशी कधीही संबंध ठेवू नये.


     हातचे सोडून पळत्याच्या पाठीमागे कधीही लागू नये. त्याने दुहेरी नुकसान होते. हातचे तर जातेच पण पळतेही निसटते.


    नदी, स्त्री, राजघराण्यातली माणसे, शस्त्र हातात घेतलेला माणूस व शिंग आणि धारदार नखे असणारा प्राणी यांच्यावर कधीही विश्वास ठेवू नये.


    आज्ञाधारक पुत्र तोच खरा पुत्र. मुलांचे पालनपोषण करतो तोच खरा पिता. जो विश्वासू असतो तोच खरा मित्र. पतीला जी पूर्ण सुख देते तीच खरी पत्नी.


    चंदनाची झाडे आणि अस्सल रत्ने सर्वत्र दिसत नाहीत. ती दुर्मिळ असतात आणि क्वचितच सापडतात. साधूसंतही असेच दुर्मिळ आहेत. चकाकते ते सर्वच सोने नसते ही म्हण माहीत असेल. या जगात नकली वस्तू खूप आहेत. अस्सल कोणते आणि नकली कोणते याची पारख करता यायला हवी.


    राजा प्रजेची काळजी घेतो. व्यापाऱ्याच्या मनात नेहमी व्यवसायाचे विचारच असतात. विद्यार्थ्याला नेहमी ज्ञान मिळवण्याची उत्सुकता असते. आणि देखण्या स्त्रीमुळे घराला शोभा येते.


    जंगलात वणवा पसरला की हरीण जंगल सोडून देते. ब्राह्मणाला दक्षिणा मिळाली की तो लगेच निघून जातो. शिष्याला ज्ञान मिळाले की तो गुरुला सोडून देतो.


    जो कर्जात बुडालेला आहे, आपल्याच लोकांकडून जो अपमानित झाला आहे, जो पत्नीपासून विभक्त आहे आणि दुष्टाशी संगत असलेला व्यक्ती आगीशिवाय भाजून निघतो.

Previous Page- Chanakya Niti in Marathi -  दैनंदिन व्यवहाराविषयी निरीक्षणे. (Page-17)

Next Page - Chanakya Niti in Marathi -   सूक्ते. (Page-19)

Tags:- Chanakya Niti in Marathi, Chanakya Niti pdf in Marathi, Chanakya Niti  ebook in Marathi, chanakya quotes, chanakya quotes in marathi, chanakya quotes on success, chanakya quotes on Advices, ethics of chanakya, ethics of chanakya in marathi,  chanakya neeti pdf download.

Comments