Chanakya Niti in Marathi - सूक्ते. (Page-19)

  सूक्ते.


    नदीकिनारी असलेले झाड, पतीला सोडून दुसऱ्याबरोबर पळून गेलेली स्त्री, न्यायी मंत्री नसलेला राजा यांचा शेवट अतिशय वाईट असतो.


    विद्या हेच ब्राह्मणाचे धन, सैन्य हेच राजाचे धन, व्यापार हेच वैशाचे धन. आणि सेवा हेच शुद्राचे धन.


    वाळलेल्या झाडावर पक्षी घरटं करीत नाही. गरीबाला वेश्या जवळ येऊ देत नाही आणि दुर्बळ राजाला त्याची प्रजा सोडून जाते, हे कायम सत्य आहे.

chanakya niti; chanakya niti in marathi; chanakya niti ebook in pdf; download chanakya niti pdf; free chanakya niti ebook; chanakya niti advise


    कुणीही कायमचा सुखी नसतो. दोष नाही असे कोणते घर आहे? रोगामुळे शरीर क्षीण होत गेले की दुःख सावली सारखं पाठ सोडत नाही.


    माणूस कोणत्या कुळातला आहे हे त्याच्या वागणुकीवरुन कळते. भाषेवरुन तो कोणत्या देशाचा आहे ते कळते. जो दुसऱ्याचा आदर करतो तो नेहमी प्रेमळ स्वभावाचा आहे हे ओळखता येते. शरीरावरुन त्याचे खाणेपिणे कळते.


     साधू संत नेहमीच विश्वासू असतात. म्हणून राजा प्रवासात नेहमी त्यांना सोबत नेतो.


    समुद्र नेहमी कितीही शांत असला तरी वादळामुळे त्यावर लाटा उसळतात. आणि पूर येतो. पण साधूपुरुष कितीही अपमानीत झाला तरी तो आपली मर्यादा सोडीत नाही.


    कोकिळेचा गोड गळा हेच तिचे सौंदर्य. पतिव्रता धर्म हेच स्त्रीचे सौंदर्य. विद्या हेच पुरुषाचे सौदर्य. तर क्षमा हे तपस्वी माणसाचे भूषण.


    कुळाच्या रक्षणासाठी वेळ आली तर स्वत:चे बलिदान करावे. गावाच्या रक्षणासाठी कुळाचा नाश झाला तरी चालेल. देशाच्या रक्षणासाठी गाव बळी दिला तरी चालेल. आणि वेळ आली तर आत्मसन्मानासाठी सर्वस्वाचा त्याग करावा.


    कोणतीही गोष्ट अति असेल तर त्याची हानीच होते. रामाची आदर्श पत्नी रावणाने पळवली. अति गर्व केल्याने रावणाने आपले स्वत:चे कुळही नष्ट केले. अति दानधर्म केल्याने वामनाने बळीला पाताळात लोटले.


    एखाद्याची महत्वाकांक्षा जागृत झाली की मग त्याला काहीही अवघड नाही. व्यापार करणाऱ्याला कोणताही देश दूर नसतो. विव्दानाला कोणताही देश परका नसतो. कुठेही गेला तरी तो घरी असल्यासारखाच असतो.

Previous Page- Chanakya Niti in Marathi -   सूक्ते. (Page-18)

Next Page - Chanakya Niti in Marathi -   सूक्ते. (Page-20)

Tags:- chanakya niti advise,Chanakya Niti in Marathi, Chanakya Niti pdf in Marathi, Chanakya Niti  ebook in Marathi, chanakya quotes, chanakya quotes in marathi, chanakya quotes on success, chanakya quotes on Advices, ethics of chanakya, ethics of chanakya in marathi,  chanakya neeti pdf download. Chanakya advices for prostitute .Sampurna chanakya neeti.

Comments