दैनंदिन व्यवहाराविषयी निरीक्षणे.
मोक्षमुक्ती आणि बंधन याला कारण मनच. म्हणून मनावर नियंत्रण ठेवावे.
ज्याचे मन अस्थिर आणि चंचल आहे त्याला माणसात राहूनही सुख मिळत नाही आणि जंगलात एकांतात राहूनही शांती मिळत नाही. असा माणूस कुठेही असला तरी असंतुष्ट असतो.
कुदळीने खोल खणल्यावरच पाणी लागते. त्याप्रमाणे गुरुची खूप सेवा केल्यानेच विद्या मिळते.
जसे पेरावे तसे उगवते. माणसाचे जसे कर्म तसे फळ मिळते. म्हणून शहाणा माणूस नेहमी पूर्ण विचार करुनच कोणतंही काम करतात.
गुरुचा अपमान करणाऱ्या शिष्याला पुढच्या जन्मात नरकात जावे लागते. म्हणून गुरुने कितीही थोडे शिकवले असले तरी त्याचा नेहमीच आदर करावा.
आहार, निद्रा, भ्रम आणि मैथुन हे गुण पशृंमध्येही आहेत. मग पशूमध्ये आणि माणसात फरक काय आहे? माणसाला ज्ञान मिळवता येते. त्याच्यापाशी बुध्दि आहे. बुध्दीहीन आणि ज्ञानहीन माणूस हा पशूसारखाच असतो.
दुसऱ्यावर उपकार करणाऱ्या माणसाला नेहमीच सुख आणि समृध्दी मिळते. त्याच्या समस्या आपोआप दूर होतात.
कष्ट केल्याशिवाय हवी असलेली गोष्ट मिळत नाही. शिस्त आणि कष्ट केल्यानेच इच्छित फळ प्राप्त होते.
आयुष्यात माणसाने दोन गोष्टी स्विकारायला हव्यात. एक गोड बोलणे आणि दुसरी चांगल्या माणसांशी मैत्री. सज्जनांच्या संगतीत राहिल्याने वाणी गोड होते आणि त्याचे आयुष्य सुखी होते.
मित्राचा विश्वासघात, शत्रूला जाऊन मिळणे, अनैतिक मार्गाने पैसा कमावणे, या गोष्टी परिस्थिती कितीही वाईट असली तरी करु नये. लबाडीने मिळवलेला पैसा लवकर नष्ट होतो.
अनैतिक मार्गाने मिळवलेला पैसा फार तर दहा वर्ष टिकतो. त्यानंतर तो नष्ट होतोच शिवाय त्या माणसालाही नष्ट करतो. म्हणून लबाडीने कधीही पैसा कमावू नये.
गुरुने शिष्याला कितीही अल्प ज्ञान दिले तरी शिष्याने त्याचा आदर करावा. शिकवणे आणि ज्ञान देणे याच्या इतके श्रेष्ठ दान कोणतेच नाही. अशा दानाची परतफेड कधीच करता येत नाही.
कोणतेही बी पेरताना त्याचे फळ कोणते येणार आहे त्याचा आधीच विचार करावा. कर्म करण्यापूर्वीच त्याच्या फळाचा विचार करावा. फळ वाईट मिळणार असेल तर असे कर्म कधी करु नये.
Previous Page- Chanakya Niti in Marathi - दैनंदिन व्यवहाराविषयी निरीक्षणे. (Page-15)
Next Page - Chanakya Niti in Marathi - दैनंदिन व्यवहाराविषयी निरीक्षणे. (Page-17)
Tags:- chanakya niti book in marathi, chanakya niti book in marathi pdf free download, chanakya niti book in marathi free, chanakya niti ,chanakya niti quotes in marathi; chanakya niti pdf marathi; chanakya niti book in marathi; chanakya niti for success,chanakya niti book.Is chanakya a horse?,About Niti slogans in Hindi
Comments
Post a Comment