Chanakya Niti in Marathi - दैनंदिन व्यवहाराविषयी निरीक्षणे. (Page-15)

  दैनंदिन व्यवहाराविषयी निरीक्षणे.


    अन्नापेक्षा कणीक दसपट शक्ती देते. कणकेपेक्षा दूध दसपट शक्ती देते. दुधाच्या दहापट मांस आणि मांसाच्या दहापट तूप शक्ती देते. म्हणून ताकद मिळवण्यास तूपच सर्वश्रेष्ठ आहे.


    दूध शक्ती देते. तूपाने वीर्य घट्ट होते. आणि मंसाने स्नायु बळकट होतात. मद्यपान हे शरीराला आणि मनाला हानीकारक आहे.


    घरातील लोकांशी उदारपणे वागणारा, इतरांशी आपलेपणाने वागणारा, दुष्टांशी कठोरपणे वागणारा, विव्दानांशी नम्रतेने वागणारा माणूस शहाणा असतो.


     जो शत्रूशी शौर्याने लढतो, वडिलधाऱ्यांसमोर नम्रतेने वागतो, परस्त्रीशी आदराने वागतो, लबाड लोकांशी धूर्तपणे वागतो असा माणूस नेहमी सुखी असतो.


    जो माणूस विचार न करता पैशाची उधळपट्टी करतो, कुणाशीही भांडतो, प्रत्येक स्त्रीचा मग ती कोणत्याही वर्णाची, जातीची, कुळाची असो तिचा उपभोग घेण्याची इच्छा करतो, असा माणूस फार दिवस जगत नाही.


    जो माणूस कोणतेही ज्ञान शिकण्यास तत्पर असतो, कोणाच्याही हातचे जेवण घेण्यास कचरत नाही, आणि आपल्याजवळ जे आहे ते इतरांना देण्यास सदैव तयार असतो तो शांत, स्थिरमनाचा आणि सुखी असतो.


    भूतकाळ कुणालाही बदलता येत नाही. पण भविष्याची चिंता केल्याने आपला वर्तमानकाळ मात्र वाया जातो. भूतकाळ परत येत नाही. भविष्यकाळात काय आहे माहीत नाही. म्हणून नेहमी वर्तमानकाळाचा विचार करावा. जो वर्तमानकाळाच्या मार्गावरुन चालतो त्यालाच सुखाची शिखरे पादाक्रांत करता येतात.


    अंधविश्वास आणि पोकळ आशावाद यामुळे दुःख, यातना अस्वास्थ्य आणि भीति वाट्याला येते. म्हणून शहाणा माणूस अशा लोकांशी कधीच संबंध ठेवत नाही. आणि तो म्हणूनच सुखी असतो.


    जो माणूस येणाऱ्या संकटातून सुटका करण्याचा मार्ग आधीच शोधतो, संकट समोर आलेच तर धैर्याने त्याला तोंड देतो तो माणूस सुखी होतो. जे व्हायचे असेल ते होईल, जे नशिबात असेल ते भोगावेच लागणार आहे, असा विचार करणाऱ्या माणसाला आपल्या बुध्दीचा आणि सामर्थ्याचा कधीच उपयोग करता येत नाही.

    मनामुळेच भौतिक सुखे भोगण्याची इच्छा होते. मनामुळेच भौतिक सुखाच्या वासनेतून सुटका करुन घेऊन मुक्ती मिळवता येते.
 

Previous Page- Chanakya Niti in Marathi -  दैनंदिन व्यवहाराविषयी निरीक्षणे. (Page-14)

Next Page - Chanakya Niti in Marathi -  दैनंदिन व्यवहाराविषयी निरीक्षणे. (Page-16)

Tags:-   chanakya niti book in marathi, chanakya niti book in marathi pdf free download, chanakya niti book in marathi free, chanakya niti ,chanakya niti quotes in marathi; chanakya niti pdf marathi; chanakya niti book in marathi; chanakya niti for success,chanakya niti book.Is chanakya a horse?,About Niti slogans in Hindi

Comments