Chanakya Niti in Marathi - धर्माविषयी. (Page-11)

धर्माविषयी


     हे शरीर नाशवंत आहे. पैसा आज आहे उद्या नाही. म्हणून माणसाने सतत धर्मकार्य करीत रहावे. तीच सर्वात मोठी संपत्ती आहे. शेवटी तीच उपयोगी पडते.


    माणसाच्या अंगात पुष्कळ सद्गुण असतात. पण तो त्याचा उपयोग चांगल्या कामासाठी करतो की नाही हा मोठाच प्रश्न आहे.


    कल्पवृक्ष म्हणजे तरी काय एक लाकूडच. मेरुपर्वत अचल असला तरी तो काय एक दगडच. चिंतामणी हासुध्दा एक दगडच आणि कामधेनु म्हणजे शेवटी गायच. म्हणून हे रामा तुझी कुणाशीही तुलना होऊ शकत नाही. तुझ्यासारखा तूच.


    आयुष्य, कर्म, विद्या, पैसा व मृत्यू या गोष्टी प्राणी गर्भावस्थेत असतानाच ठरलेले असते. त्यात माणसाला बदल करता येत नाही.


    माणसाला परमेश्वराचे ज्ञान झाले की त्याचा अभिमान गळून जातो. व त्याची चित्तवृत्ती स्थिर होते. हीच समाधी.


    गुरुच्या उपदेशाने किंवा स्मशानात प्रेत जळताना पाहून वैराग्य प्राप्त होते. हे वैराग्य ज्याला टिकवता आले त्याला संसारात नेहमीच समाधान लाभते. अशा माणसाला कैवल्यज्ञान प्राप्त होते.


    डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा ही ज्ञानेन्द्रिये आणि हात, पाय, तोंड, जननेंद्रिय आणि गुद ही कर्मेन्द्रिये आहेत. माणूस यांचा गुलाम असतो. ऐहिकसुखाच्या पलिकडे जायचे असेल तर पंचेन्द्रिये आणि कर्मेन्द्रियांवर नियंत्रण मिळवायला हवे. तरच तो या जन्म- मृत्यूच्या फेऱ्यातून बाहेर पडून त्याचा आत्मा मुक्त होतो.


    जो स्वच्छता पाळत नाही, आळशी असतो त्याला लक्ष्मी सोडून देते. तो दरिद्री होतो.


Previous Page- Chanakya Niti in Marathi - धर्माविषयी. (Page-10)

Next Page -   Chanakya Niti in Marathi -  दैनंदिन व्यवहाराविषयी निरीक्षणे. (Page-12)

Tags:-  chanakya niti; chanakya niti in marathi; chanakya niti ebook in pdf; download chanakya niti pdf; free chanakya niti ebook; Chanakya Niti in Marathi- Family Advices;chanakya niti in marathi; chanakya niti book; chanakya niti quotes in marathi; chanakya niti pdf marathi; chanakya niti book in marathi; chanakya niti for success.

Comments