Chanakya Niti in Marathi - धर्माविषयी. (Page-10)


 धर्माविषयी. 


    सगळ्या गोष्टी विधिलिखितानुसारच होतात. माणसाच्या बुध्दीवर आणि मनावर नशिबाचं नियंत्रण असतं. त्याच्या आयुष्यावर नक्षत्रांचा आणि ग्रहांचा प्रभाव असतो. आयुष्यात जे काही होते ते नशिबात असेल तरच होते.


    विधिलिखितासमोर परमेश्वराचंही काही चालत नाही. जगात निसर्गाच्या नियमानुसारच सगळे होते. परमेश्वरालासुध्दा या नियमांचे पालन करावे लागते.


    जगाच्या पाठीवर जे काही घडतं ते परमेश्वराच्या इच्छेनुसार घडतं. ब्रह्माची इच्छा असेल तर रंकाचा राव करेल किंवा रावाचा रंक.

chanakya niti in marathi; chanakya niti book; chanakya niti quotes in marathi; chanakya niti pdf marathi; chanakya niti book in marathi; chanakya niti for success;


    या जगातील सर्व गोष्टींचा कर्ता करविता तो श्रीहरी असेल तर मग मला कोणत्याच गोष्टीची काळजी करण्याचे कारणच काय? अजाण अर्भकाला त्याची माता दूध पाजते. तिच्या स्तनात दूध निर्माण कोण करतो? हे श्रीहरी माझे तुला कोटी कोटी प्रणाम. तुझी कृपा असेल तर मला काळजी करण्याचे कारण नाही.


    कलियुग दोन हजार पाचशे वर्षाचे आहे. या काळात माणसाचे सगळे सद्गुण हिरावून घेतले जातील.


    या काळात अराजक माजेल. गंगा अपवित्र होईल. पृथ्वीवर विष्णुचा प्रभाव राहणार नाही. राक्षस पृथ्वीवर राज्य करतील. जगाचा शेवट जवळ येईल. जगाचा पूर्ण नाश झाल्याशिवाय नविन जग निर्माण होणार नाही. उत्पत्ती आणि विलय हे चक्र सतत चालूच राहणार आहे.


    मन जर अनैतिक कर्माच्या विचाराने आणि पापाने भरलेले असेल तर कितीही धार्मिक यात्रा केल्यातरी त्याला पुण्य लाभत नाही. अशा पतीत माणसाला कधीच मुक्ती मिळत नाही. मद्याचे भांडे कितीही धुतले तरी ते स्वच्छ होत नाही.


    जेवताना कधीही गप्पा मारु नयेत. जेवताना मौन पाळणे पवित्र समजावे. वर्षभर जेवताना जो मौन पाळतो त्याला दिर्घायुष्य आणि आत्मिक शांती लाभते.


जो दयाळू माणूस भुकेलेल्या माणसाला जेवण देतो आणि ब्राह्मणाला दान देतो त्याला परमेश्वर अनेकपटीने त्याचे फळ देतो.


    जो भगवान कृष्णाच्या पदकमलाचे दर्शन घेत नाही, राधाकृष्णाच्या भजनात रमत नाही, ज्याने भगवान कृष्णाची गीता वाचली नाही, त्याचे जीवन व्यर्थ होय. अशा माणसाला आत्म्याचे ज्ञान कधीच मिळत नाही. आणि त्याचे जीवन सार्थक कधीच होत नाही.


    कदंबाला शिशिरात पालवी फुटत नाही यात वसंत ऋतुचा काय दोष? घुबडाला दिवसा दिसत नाही यात सूर्याचा काय दोष? चातक पक्ष्याच्या चोचीत पाण्याचा थेंब पडत नाही यात मेघांचा काय दोष? कारण विधिलिखित कुणीच बदलू शकत नाही.

Previous Page- Chanakya Niti in Marathi - धर्माविषयी. (Page-09)

Next Page - Chanakya Niti in Marathi - धर्माविषयी . (Page-11)

Tags:-  chanakya niti; chanakya niti in marathi; chanakya niti ebook in pdf; download chanakya niti pdf; free chanakya niti ebook; Chanakya Niti in Marathi- Family Advices;chanakya niti in marathi; chanakya niti book; chanakya niti quotes in marathi; chanakya niti pdf marathi; chanakya niti book in marathi; chanakya niti for success.

Comments