कुटुंबाविषयी
शहाण्या माणसांनी आपल्या मुलांना नेहमी सदाचाराचे शिक्षण द्यायला हवे. बरेवाईट काम आहे ते समजावून संगायला हवे. त्यांना चांगल्या सवयी लावायला हव्यात. म्हणजे अशी मुले मोठेपणी चांगली वागून कुळाचे नाव काढतात.
पालकांनी आपल्या मुलांना उत्तमातले उत्तम शिक्षण देणे हे त्यांचे परम कर्तव्य आहे. जे आईवडिल असे शिक्षण देत नाहीत त्यांची मुले कुटुंबासाठी शत्रुच होतात. हंसाच्या समुहात जसा बगळा नकोसा वाटतो त्या प्रमाणे ही शहाणी नसलेली मुले समाजाला शोभत नाहीत.
मुलांचे नको ते हट्ट पुरवल्याने आणि त्यांचे अतिलाड केल्याने आईवडिल त्यांना शहाणे करण्याऐवजी बिघडवतात. म्हणून आईवडिलांनी योग्यवेळी मुलाला जरुर तर शिक्षा करुन त्यांना ताळयावर आणायला हवं. त्यांना शिस्त लावायला हवी. अशी मुले मोठेपणी सद्गुणी होतात.
लहान मुले ओल्या मातीच्या गोळयासारखे असतात. लहानवयातच त्यांना तुम्ही जसा आकार द्याल तसे ते घडतात. मुलांना जसे शिकवावे तशी ती होतात.
जंगलामध्ये असंख्य झाडे असतात. त्यातील एकाला जरी सुवासिक फुले असली तर सगळे जंगल आणि सगळा परिसर सुगंधित होऊन जातो. त्याप्रमाणे घराण्यात एक सदगुणी पुत्र असेल तर तो घराण्याचे नाव काढतो.
जंगलात एका झाडाला आग लागली तरी सारे जंगल जळून जाते. त्याप्रमाणे घराण्यात एक मुलगा जरी दुर्व्यसनी असला तरी सर्व घराण्याचे नुकसान होते.
अनेक मुले असावीत अशी अपेक्षा ठेवावी कशाला? एक शहाणा पुत्र असणे परवडते. शहाणासुर्ता व कर्तासवरता एकच मुलगा घराचा आधार असतो.
मुलगा पाच वर्षाचा होईपर्यंत त्याचे लाड करावे. दहा वर्षाचा होईपर्यत त्याला जरुर तिथं शिक्षा करुन शिस्त लावावी. सोळा वर्षाचा झाला की मग मात्र त्याला बरोबरीच्या मित्रासारखे वागवावे.
ज्या घरात मूर्त्यांना मान मिळत नाही किंवा त्यांचा आदर होत नाही अशाच घराला वैभव प्राप्त होते. ज्या घरात पत्नी काटकसरीने संसार करते, पतीपत्नीमध्ये भांडणे होत नाहीत त्या घरातून लक्ष्मी कधी बाहेर जात नाही.
शंभर मूर्ख पुत्र असण्याऐवजी एक सद्गुणी पुत्र असलेला चांगला. रात्री आकाशात असंख्य तारे असतात. पण प्रकाश देणारा चंद्र एकच असतो.
मूर्ख पुत्र घरातून निघून गेला तर फारसे वाईट वाटून घेऊ नये. काळाच्या ओघात त्याची आठवण विसरुन जाते. पण तो घरात असता तर त्याचे अस्तित्व नकोसे वाटते.
Previous Page- Chanakya Niti in Marathi - कुटुंबाविषयी. (Page-06)
Next Page - Chanakya Niti in Marathi - कुटुंबाविषयी . (Page-08)
Tags;- chanakya niti; chanakya niti in marathi; chanakya niti ebook in pdf; download chanakya niti pdf; free chanakya niti ebook; Chanakya Niti in Marathi- Family Advices; ethics of chanakya neeti;
Comments
Post a Comment