मित्राविषयी.
स्वार्थ असल्याशिवाय कुणी कुणाशी मैत्री करीत नाही. स्वार्थ नसेल तर कुणालाच मैत्री करण्याची इच्छा होणार नाही. हे एक कटु सत्य आहे.
मित्राची खरी परीक्षा संकटकाळी होते. जोपर्यत तुमच्यापाशी धन आहे तोपर्यत माणसे तुम्हाला साथ देतात. पण खरा मित्र तुमच्या संकटकाळीसुध्दा तुम्हाला साथ करतो.
संकटकाळी जो मदतीला धावून येतो तोच खरा मित्र. असा मित्र संकटापासून तुमचं रक्षण करतो. असा मित्र सख्ख्या भावापेक्षाही जवळचा असतो.
सापाची मंगसाशी, बकरीची वाघाशी, चित्त्याची हत्तीशी, वाघिणीची कुत्र्याशी कधीही मैत्री होऊ शकणार नाही. तसेच दुष्ट प्रवृत्तीच्या माणसाशी कधीही मैत्री होऊ शकत नाही. अशी मैत्री वरवरची असते. अशा मित्रावर कधीही विश्वास ठेवू नये.
चांगल्या मित्रावर नेहमीच विश्वास ठेवावा. वाईट प्रवृत्तीचा मित्र शत्रुपेक्षाही धोकादायक असतो. त्याच्यावर कधीही विश्वास ठेवू नये.
आरसा जसा आपले प्रतिबिंब दाखवतो, तसेच एखाद्याच्या मित्रांवरुन एखाद्याचे चारित्र्य दिसून येते. म्हणून मित्रांची निवड काळजीपूर्वक र् कारण तुमच्या मित्रांवरुन तुमचा स्वभाव आणि सवयी कशा आहेत ते कळतं.
लबाड माणसाशी मैत्री कधी करु नये. ते अतिशय बडबडया स्वभावाचे आणि त्यांचं वागणं अतळ असतं. त्यांच्या बोलण्यात समंजसपणा नसतो. शहाणा माणूस अशा मित्रांपासून नेहमीच दूर असतो.
संकटकाळी तुमच्यासाठी जो स्वत:चे रक्त, घामासारखे सहज सांडून तुमचे रक्षण करतो तोच खरा मित्र. बाकीचे मित्र ढोंगी आहेत असे समजावे.
मित्राच्या परिवारातील स्त्रीशी अनैतिक संबंध ठेवणे यासारखे दुसरे पाप नाही.
सुदामा व कृष्ण, कृष्ण व अर्जुन, राम व बिभीषण ही सर्व आदर्श मैत्रीची लक्षणे आहेत. मैत्रीचा आदर्श असावा तर असा.
मित्र हा काळजीपूर्वक र आणि शांतपणे विचार करुन निवडावा. विचार न करता घाईघाईनं निवड केलेला मित्र केंव्हा शत्रू होईल र सांगता ता येत नाही.
मुलगा वयात आला की बापाने त्याला मित्र मानावे.
तरुणीशी विवाह करण्यापूर्वी तिच्याशी मैत्री करावी. म्हणजे तिचा स्वभाव कळतो. जीवनात असे बरेच अनुभव घेतल्यानंतर वस्तुस्थितीची जाणीव होते.
Previous Page- Chanakya Niti in Marathi - मित्राविषयी. (Page-04)
Comments
Post a Comment