Chanakya Niti in Marathi - सूक्ते. (Page-21)

 सूक्ते.


    अज्ञानी माणूस पंडिताशी काही कारण नसताना भांडू लागला तर त्याला आपल्या कर्माचे फळ भोगावेच लागते.


    दानधर्म केल्याने दारिद्रय नाहीसे होते. ज्ञानी माणसाचा उपदेश अज्ञानी माणसाच्या आयुष्यातला अंधार दूर करतो. सद्हेतू मुळे दुसऱ्याच्या मनातली भीती नाहीशी होते.


    कामवासनेमुळे माणूस मनाने दरिद्री होतो. शरीराने अशक्त आणि रोगी होतो. अज्ञानासारखा शत्रू नाही. संतापासारखी आग नाही. ती हृदय जाळून टाकते. ज्ञानासारखे सुख नाही.


    प्रत्येकाला आपल्या कर्माचे फळ भोगावेच लागते. आपले कर्म सावलीसारखे आपल्या मागे येते. आपल्या कर्मामुळे आपणच नरक निर्माण करतो. तप केल्यानंतरच यातून मुक्ती मिळते.


    ज्ञानी माणसाला स्वर्गसुखाची काही किंमत नसते. ऐहिक जग निरर्थक वाटते. मनावर आणि इंद्रियावर संयम असलेल्या माणसावर सुंदर स्त्री मोहिनी घालू शकत नाही.

chanakya niti; chanakya niti in marathi; chanakya niti ebook in pdf; download chanakya niti pdf; free chanakya niti ebook; chanakya niti advise for Motivation; chanakya niti in marathi language.;


    मृत्यूनंतर त्याचे कर्मच त्याला मार्ग दाखवते. चांगले कर्म हे रोग्याला औषध मिळाल्यासारखे असते. आणि अज्ञानी माणसाला ज्ञान मिळाल्यासारखे असते.


    पावसाच्या पाण्याने समुद्राला पूर येणार नाही. पोट भरलेल्या माणसाला सुग्रास अन्नही नकोसे होते. श्रीमंत माणसाने दान केले तर त्याचे नुकसान होत नाही.


    ढगातून पडणाऱ्या पाण्यासारखे दुसरे स्वच्छ पाणी नाही. कोणतेही काम शांतपणे आणि धैर्याने केले तरच ते पूर्ण होते. तेजस्वी डोळ्यासारखे तेज जगात दुसरे कोणतेही नाही.


    गरीबी सहन करणाऱ्या माणसाला श्रीमंत व्हावेसे वाटते. पशूला बंधनातून मुक्त व्हावेसे वाटते. मर्त्य माणसाला स्वर्गाची आशा असते. निरिच्छ आणि समाधानाचा मार्ग हा दूरचा आणि खडतर असतो.


    माणसात न्हावी, पक्ष्यात कावळा, पशूत कुत्रा आणि कुलटा स्त्री यांचे मन कुणालाही जाणता येत नाही. ते अतिशय हुषार आणि कपटी असतात.


    जे वरुन साधू आणि आतून संधीसाधू असतात ते तिरस्करणीय असतात. पण दुसऱ्याची निंदानालस्ती करणारे, अफवा पसरवणारे हे पृथ्वीवरचे सगळ्यात वाईट माणसं आहेत.


    भांडे राखेने घासल्याने, तांब्याचे भांडे चिंचेने घासल्याने, नदीचे पाणी पाऊस पडल्याने आणि स्त्री रजस्वला होण्याने शुध्द होते. मात्रं वंदनीय नाही. तिला कुणीही मान देत नाही. ती खाली मान घालून चालत असली तरी तिच्याकडे सगळे संशयानेच बघतात.

Previous Page- Chanakya Niti in Marathi -   सूक्ते. (Page-20)

Next Page - Chanakya Niti in Marathi -   सूक्ते. (Page-22)

Tags:- chanakya niti advise,Chanakya Niti in Marathi, Chanakya Niti pdf in Marathi, Chanakya Niti  ebook in Marathi, chanakya quotes, chanakya quotes in marathi, Brief summary of Chanakya and rakshasa,, chanakya quotes on Advices, Chanakya's says on leadership of a ruler, ethics of chanakya in marathi,  chanakya neeti pdf download. Chanakya advices for prostitute .Sampurna chanakya neeti. Chanakya Nit for Leadership.

Comments