Chanakya Niti in Marathi - स्त्रीविषयी . (Page-03)

   स्त्रीविषयी   


    संस्कृतचा गाढा पंडित आणि प्रत्यक्ष देवही स्वर्गातील अप्सरांचे अधरावर ओठ टेकायला मिळावे म्हणून धडपड करीत असतात. थोडक्यात, शहाण्यातला शहाणा पुरुषही परस्त्रीची अभिलाषा धरीतच असतात.


    पुरुषाला सगळ्यात मोठा मोह कोणत्या गोष्टीचा पडत असेल तर तो स्त्रीचा. त्याचं मन स्त्रीभोवतीच घोटाळत असते. तिच्या आक्रमक-पणामुळे आणि विविध प्रकाराच्या नखऱ्यामुळे ती लवकरच पुरुषाला वासनेच्या जाळ्यात ओढून व्यभिचार करायला लावते.


    स्त्री कितीही मोहक असली तरी आणि सोंदर्याचा कोरीव पुतळा असली तरी एक नाशवंत रक्तामासाचा गोळाच तर असते. तरीपण शहाणीसुरते पुरुषसुध्दा तिच्या रुपाला भाळतात व परस्त्रीच्या आहारी जाऊन नरकाचे धनी होतात. शहाण्या माणसाने परस्त्रीच्या मोहात पडू नये.


        "हे वृध्द गृहस्था, तू काय शोधत आहेस? तुझे काही हरवले आहे काय?" 

        "मूर्ख माणसा, मी माझं तारुण्य शोधत आहे.”


    प्रत्येक स्त्रीची एकच इच्छा असते. आपले मोहक तारुण्य कधीही नाश होऊ नये. आपण कधीही वृध्द होऊ नये. आपले तारुण्य व सौंदर्य नेहमीच उमलत्या फुलासारखे टवटवीत रहावे.


    शरीरसुख मिळावे म्हणून पुरुष नेहमी अनेक स्त्रीयांच्या मागे का लागतो? शरीरसुख एकच असते. प्रत्येक स्त्रीत वेगळे सुख आहे ही एक चुकीची समजुत आहे.


    स्त्री जेंव्हा रजस्वला असते तेंव्हा तिच्याशी पुरुषाने कधीही संभोग करु नये. रजस्वला असताना संबंध ठेवल्यास पुरुषाचे आयुष्य कमी होते.


    घरातील भांडणे स्त्री समंजस नसली तरच होतात. म्हणून शहाण्या पुरुषाने तिचे कधी ऐकू नये. जगातील मोठमोठाली युध्देही स्त्रीमुळेच घडली आहेत. म्हणूनच सदगुणी स्त्री या पापापासून दूर राहते.


    संसारात रमणारी सद्गुणी व चतुर स्त्री सकाळी पतीची मातेप्रमाणे सेवा करते. दुपारी ती त्याची बहीण असते आणि रात्री त्याला शरीरसुख देणारी मैत्रीण असते. अशी स्त्री पतीला सुख देते आणि त्याचा विश्वास संपादन करते. अशी स्त्री रुपाने सामान्य असली तरी पतीला आवडते.

Previous Page- Chanakya Niti in Marathi -  स्त्रीविषयी . (Page-02)



Tags :- chanakya niti; chanakya niti in marathi; chanakya niti ebook  pdf; download chanakya niti pdf; free chanakya niti ebook; marathi ebooks; Chanakya Niti and advices in marathi.

Comments