स्त्रीविषयी . (Page-02)
पुरुषापेक्षा स्त्रीया अतिशय नाजुक असतात. तरीसुध्दा त्या पुरुषापेक्षा चौपट निर्लज्ज असतात. पुरुषापेक्षा सहापट धीट असतात. मात्र तिची वासना पुरुषापेक्षा आठपट जास्त असते.
राजाच्या, गुरुच्या आणि मित्राच्या पत्नीचा तसेच सासूचा पुरुषाने नेहमीच आदर करायला हवा. त्यांच्याशी शरीरसंबंध ठेवणारा माणूस अत्यंत पापी होय. प्रत्येक धर्मामध्ये स्त्रीला नेहमीच आदराने वागवायला सांगितले आहे. कारण त्या नेहमीच आदरणीय असतात.
प्रेमाचे बंधन हे अतिशय बळकट असते. कमळात अडकलेला भुंगा जसा कमळपुष्प मिटल्यावर त्यातून बाहेर येऊ शकत नाही. तसा स्त्रीच्या प्रेमबंधनात अडकलेला पुरुष तिच्यापासून दूर होऊ शकत नाही. संसारात अनेक प्रकारची बंधने आहेत. पण प्रेमाचे बंधन हे सर्वात बळकट समजले जाते.
एखादी परस्त्री आपल्या प्रेमात पडली आहे असा समज पुरुषाने कधीही करुन घेऊ नये. पण अशी स्त्री परपुरुषाला कळसुत्री बाहुलीसारखे नाचवते.
जी स्त्री लागटपणे बोलते, दुसऱ्याला आकर्षित करेल असे हावभाव करते, नेहमी परपुरुषाचे चिंतन करते ती एकनिष्ठ कधीच असू शकत नाही. अशी स्त्री नेहमीच व्यभिचारी असते.
जी स्त्री आपल्या पतीची संमती नसतानाही उपवास व व्रतवैकल्ये करते अशा स्त्रीच्या पतीचे आयुष्य कमी होते. आणि तीही शेवटी वाईट गतीला जाते.
एखाद्या स्त्रीने भरपूर दानधर्म केला, तीर्थयात्रा केल्या, व्रतवैकल्ये केली तरी त्याने ती पवित्र होत नाही. पण तिने केवळ नवऱ्याच्या पायाचे तीर्थ घेतले तरी पवित्र होते.
नेपाळमध्ये एक प्रथा अशी आहे. नवऱ्याच्या पायाचा अंगठा तांब्याच्या ताम्हनात धुतात व ते पाणी तीर्थ म्हणून पत्नी घेते. असे करण्याने त्याचे आयुष्य वाढते. त्याला आजारपण येत नाही व त्याला सुख व समृध्दि प्राप्त होते.
लबाडी करणे, दुसऱ्याला त्रास देणे, मूर्खपणा, लोभ धरणे, न शोभणाऱ्या गोष्टी करणे हे स्त्रियांचे ठिकाणी आढळणारे प्रमुख दोष मानले जातात. अशा वर्तनाची स्त्री बघून संभ्रमीत होऊ नका.
या उलट जी नेहमी पवित्रपणे वागते, हुशारीने संसार करते, नवऱ्यावर मनापासून प्रेम करते, नेहमी सत्य बोलते, अशी स्त्री म्हणजेच संसाराचे खरे भूषण. अशी स्त्री मिळणारा पुरुष भाग्यवान असतो.
Previous Page- Chanakya Niti in Marathi - स्त्रीविषयी. (Page-01)
Next Page :- Chanakya Niti in Marathi - स्त्रीविषयी . (Page-03)
Comments
Post a Comment