Chanakya Niti in Marathi - धर्माविषयी. (Page-09)

 धर्माविषयी


    त्र्यैलोक्याचा जो स्वामी विष्णु त्याला मी प्रथम नमन करतो. सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी मला जे वाटते ते सांगतो. भगवान विष्णुने मला शक्ती द्यावी.


    कोणत्याही चांगल्या सुभाषिताचे संपूर्ण, ते न जमल्यास त्यातील एका ओळीचे तरी चिंतन करावे. प्रत्येक वेळेस काही ना काहीतरी धर्म किंवा अध्ययन करावे.


    परमेश्वराने माणसाला अतिशय मौल्यवान असे आयुष्य दिले आहे. बळकट शरीर ही त्याचीच देणगी आहे. मृत्यू येत नाही तोपर्यंत माणसाने आपल्यासाठी आणि मानवाच्या कल्याणासाठी काहीतरी सत्कर्म करावे. मृत्यूने एकदा का झडप घातली की आपण काहीही करु शकत नाही. आपल्या नशिबावर आपले नियंत्रण नसते.

chanakya niti in marathi; chanakya niti book; chanakya niti quotes in marathi; chanakya niti pdf marathi; chanakya niti book in marathi; chanakya niti for success;


    काहीजण अग्नीला अतिशय पवित्र देवता मानतात. काहीजण परमेश्वराला एखाद्या मूर्तीत बघतात. ज्ञानी माणसाला सर्वत्रच परमेश्वर दिसत असतो. हा सर्व संसारच परमेश्वरमय आहे असे त्यांना वाटते.


    माणसाचे जीवन क्षणभंगुर आहे. हा संसार, हे जगही क्षणभंगुर आहे. आपले आयुष्य काय आज आहे उद्या नाही. अशा या क्षणभंगुर जगात केवळ सत्य तेवढे शाश्वत आहे. माणसाने नेहमी सत्याने आणि धर्माने वागावे.


    ज्याला बहुश्रुत व्हायचे असेल त्याने उत्तम श्रोता बनायला हवे. केवळ ऐकण्याने सत्य जाणून घेता येते. आणि स्वत:विषयीचे ज्ञान प्राप्त होऊ शकते. नुसते ऐकण्याने माणसाला अनेक शक्ती प्राप्त होतात. शिवाय सकारात्मक विचार करण्याची पात्रता येते.

Previous Page- Chanakya Niti in Marathi - कुटुंबाविषयी. (Page-08)

Next Page - Chanakya Niti in Marathi - धर्माविषयी . (Page-10)

Tags:-  chanakya niti; chanakya niti in marathi; chanakya niti ebook in pdf; download chanakya niti pdf; free chanakya niti ebook; Chanakya Niti in Marathi- Family Advices;chanakya niti in marathi; chanakya niti book; chanakya niti quotes in marathi; chanakya niti pdf marathi; chanakya niti book in marathi; chanakya niti for success.

Comments