स्त्रीविषयी (Page-01)
त्र्यैलोक्याचा जो स्वामी विष्णु त्याने कृष्ण अवतारात करांगुलीवर गोवर्धन पर्वत उचलून धरला आणि इंद्राच्या आदेशावरुन वरुणाने पाडलेल्या मुसळधार वर्षापासून प्रजेचे रक्षण केले होते. असा गोवर्धन गिरीधारीसुध्दा स्त्रीच्या मोहातून सुटू शकला नाही. मग अशा स्त्रीपुढे सामान्य माणसाची काय कथा! स्त्रिया जादूगार असतात. त्या भुरळ पाडतात आणि तिचे दर्शन मनाला संतुष्ट करणारे असते. स्त्री ही परमेश्वरापेक्षाही अधिक शक्तिमानआहे.
माणसाने या संसाररुपी बंधनातून मुक्त होण्यासाठी परमेश्वराचे नामस्मरण केले पाहिजे. स्वर्गसुख मिळावे म्हणून धर्मानं सांगितलेल्या आचरणांचे पालन केले पाहिजे. हे जमत नसेल तर निदान स्त्रीच्या मोहजालापासून तरी दूर रहायला हवे. जो असे वागत नाही त्याचे वीर्य शक्ती आणि तारुण्य वाया जाते.
संकट काळी उपयोगी पडावे म्हणून काही पैसा शिल्लक टाकला पाहिजे. माणसापाशी पैसा असेल तर स्त्रीया त्याच्याकडे आकर्षित होतात. परंतु पैसा आणि स्त्री या दोन्ही गोष्टी चंचल आहेत हे माणसाने लक्षात ठेवायला हवे. या दोन्ही गोष्टी पुरुषाला सोडून केव्हा निघून जातील हे सांगता येत नाही.
विवाहाच्या बाबतीत पुरुषाने अतिशय काळजीपूर्वक निर्णय घ्यायला हवा. घाईघाईने निर्णय घेतला तर आयुष्याचे नुकसान होऊ शकते. चांगल्या कुळातील कन्या अत्यंत कुरुप असली तरी तिच्याशी विवाह करावा. हलक्या कुळातील कन्या कितीही सुंदर असली तरी तिच्याशी विवाह कधीही करु नये.
आपल्या कुळाला शोभेल अशाच कुळातील कन्येशी विवाह करावा.
Next Page :- Chanakya Niti in Marathi - स्त्रीविषयी. (Page-02)
Tags: chanakya niti; chanakya niti in marathi; chanakya niti ebook pdf; download chanakya niti pdf; free chanakya niti ebook; marathi ebooks; Chanakya Niti and advices in marathi.download chanakya niti in marathi pdf.
Comments
Post a Comment