Chanakya Niti in Marathi - कुटुंबाविषयी. (Page-08)

 कुटुंबाविषयी


    मुलगा दुर्गुणी असेल किंवा देवाची पूजा करीत नसेल तर भाकड गायीसारखा तो नकोसा होतो.

    एकाच फांदीवर असलेले गोड बोर आणि काटे यांच्या गुणांमध्ये दोन विरुध्द टोकाचे अंतर असते. एकाच आईची दोन मुले गुणाने सारखीच असतील असे नाही. एकाच नक्षत्रावर जन्माला आलेले दोन जुळे भाऊ गुणाने सारखेच असतील असे नाही.


    प्रत्येकाला पाच प्रकारचे जन्मदाते असतात. एक जन्म देणारा पिता. दुसरा मुंज लावणारा ब्राह्मण, तिसरा शिक्षण देणारा गुरु. चौथा संकटात रक्षण करणारा आणि पाचवा मालक, जो त्याच्या पोटाची व्यवस्था करतो.

chanakya niti; chanakya niti in marathi; chanakya niti ebook in pdf; download chanakya niti pdf; free chanakya niti ebook; Chanakya Niti in Marathi- Family Advices;


    कर्जबाजारी बाप, अनीतिने वागणारी आई, सुंदर देखणी पण बाहेरख्याली असलेली बायको, व भांडखार पुत्र हे चार माणसाचे सर्वात वाईट शत्रू समजावेत.


    विद्यार्थ्याने खालील आठ गोष्टींपासून नेहमी दूर रहायला हवे. त्या म्हणजे काम, क्रोध, लोभ, स्वादिष्ट व चमचमीत खाद्यपदार्थ, शृंगार, निरुद्देश भटकंती, अतिनिद्रा या गाष्टापासून दूर राहिल्यास अभ्यासात लक्ष लागून ता लवकरच हुशार हाइल.


    सुखसमाधानाने भरलेले घर, बुध्दिमान पुत्र, मधुरभाषी पत्नी असेल तर ते घर धन्य होय.


    जो दररोज शिवाची पूजा करतो. जिथं आल्यागेल्यांचा आदरसत्कार होतो ज्या घरात आज्ञाधारक नोकर र आहेत असे घर धन्य होय.  ज्या घरात सुलक्षणी स्त्री असते, गुणवान पुत्र असतो असे घर इंद्रलोकासारखे असते.


    वर सांगितल्याप्रमाणे घरातील मंडळी वागतील अशा घराला सुख आणि समाधान मिळते.


Previous Page- Chanakya Niti in Marathi - कुटुंबाविषयी. (Page-07)

Next Page - Chanakya Niti in Marathi - धर्माविषयी . (Page-09)

Tags:-  chanakya niti; chanakya niti in marathi; chanakya niti ebook in pdf; download chanakya niti pdf; free chanakya niti ebook; Chanakya Niti in Marathi- Family Advices;chanakya niti for success

Comments